फाईल अशी नुस्ती घेत नाही मी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फाईल अशी नुस्ती घेत नाही मी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, फेब्रुवारी २५, २००७

फाईल अशी नुस्ती घेत नाही मी

नोटेच्या चष्म्याशिवाय अक्षरही बघत नाही


माझा चहा संपला आहे कधीचा

कोणी नवीन बकरा कसा येत नाही?


मिळालेच नाही काल कोणी मला

एकाही फाईलला हात लागला नाही.


आलेली प्रत्येक फाईल पूर्ण करतो मी

मात्र 'वजना' शिवाय काहीही हलत नाही


फायलींचा हा ढीग माझ्या टेबलावर

पैज लावा 'खालून' आल्याशिवाय पुढे जात नाही


वागतो तू असा साहेबाच्या चमच्यागत

म्हणूनच तूझी कधी ट्रान्सफर होत नाही.