व्हिस्परींग सँडस् लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्हिस्परींग सँडस् लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, मार्च ०३, २००८

व्हिस्परींग सँडस्

व्हिस्परींग सँडस् किंवा बहासा इंडोनेशिया मध्ये पासीर बेर्बीसीक.
हा इंडोनेशियन चित्रपट इंडोनेशियाचे वेगळेच दर्शन घडवतो.

कथा अशी आहे. दया (दायन सास्त्रोवदोयो)
ही एक छोटी मुलगी तीच्या आईसोबत सागर किनार्‍या वरच्या एका छोट्याशा खेड्यात रहात असते. तीचे वडील लहानपणीच तीला सोडून गेले असतात. ते कसे असतील या विचारात ती तासंतास घालवते.
एकदा अचानक होणार्‍या दंगलीने त्यांना खेडे सोडून अजून दूरवरच्या वस्तीत जाऊन रहावे लागते. या किशोरवयीन मुलीवर आईचे करडे लक्ष असते. त्या करडेपणाला दयापण काहीशी नाखुष असते.
नव्या वस्तीत तीला एक मैत्रीण मिळते. दिघींचा काही काळ मजेत जातो पण एका घटनेत तीला तीची मैत्रीण गमवावी लागते. मात्र त्याचवेळी तिचे वडील अचानक पणे परत येतात... त्यांच्या बरोबर आलेला मित्र तीचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतो. दयाची होणारी मानसिक अवस्था अतिशय परिणामकारक रित्या दाखवली आहे. आईच्या हे सर्व लक्षात येते पुढचा अंदाज घेउन व ती दयाला या सगळ्यापासून दूर निघून जायला सांगते.

व्हिस्परींग सँडस्

कथा संथ आणि तशी साधी व सुरुवातीला पकड घेत नाही असे वाटले तरी नंतर सिनेमा उत्सुकता धरून ठेवतो.
काही प्रमाणात इंडोनेशियाचे खरे सामाजिक ग्रामीण जीवनवही बघायला मिळते.
चित्रिकरणासाठी निवडलेले लोकेशन्स आऊट ऑफ वल्ड आहेत... संगितही अप्रतीम आहे. एक वेगळेच जग. वेगळाच अनुभव.

दिग्दर्शकः नान त्रिवेणी अचनास
लेखकः नान त्रिवेणी अचनास/रय्या मकारीम
इ.स. २००१
भाषा : बहासा इंडोनेशिया
प्र.भू. :दायन सास्त्रोवदोयो
ऍवॉर्डसः एशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिव्हल चे सिनेमॅटोग्राफी, साउंड. शिवाय, ब्रिस्बेन, सियाटल, ओस्लो, व सिंगापूर यथील निरनिराळ्या प्रकारची पारितोषिके.

-निनाद