संगणकीय वाचनालये
हा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.
भारतात संदर्भग्रंथांची तशी प्राचीन परंपरा आहे. अगदी किर्तनातही ओवी अथवा अभंग कुठून घेतला हे आवर्जून सांगितले जाते. मात्र ही इतकी समर्थ परंपरा विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात लुप्तच झाली की काय असा संशय येतो.
अनेक विद्यार्थी जेंव्हा मागच्या वर्षीचाच कुणीतरी केले प्रोजेक्ट सरळ पहिले पान लावून सुपूर्त केलेले वाचतो, पाहतो तेंव्हा अजूनच वाईट वाटते. पण अशी लिखित कामाची चोरी करायची नाही ,हा भाव वाढतो आहे असेही जाणवतेच. वाचनालयांचीही रया बरेचदा गेलेली असते.मुळात आपल्याकडे वाचनालयांना
एक प्रकारची जी दुय्यम अवस्था/मानसिकता प्राप्त झाली आहे,
ती बदलणे महत्वाचे आहे.
त्यात काम करणारे एक तर अतिशय मग्रुर, पुस्तके म्हणजे वैयक्तिक संपत्ती असल्यासारखे असतात किंवा अगदीच दीन दुबळे गरिब आणि तंत्रज्ञानाशी चुकूनही संबंध न आलेले असतात. पुण्याच्या भांडारकर प्राच्यचे पुस्तकाचे दालन खरं तर घरा घरात पोहोचले पाहिजे असे आहे.
या शिवाय, माझ्यामते आज मराठी मधे संदर्भांचा शोध घेणे फार अवघड काम आहे.
कारण बहुतेक लेखन पिडिएफ फॉर्मॅटमध्ये चित्र स्वरूपात आहे. हा फार मोठा अडथळा आहे. कारण जालावर शब्द दिला तरी चित्र स्वरुपातले लिखाण शोधकिड्यांद्वारे वाचलेच जात नाही. फक्त युनिकोडीत लिखाणाचाच शोध मिळतो.
अर्थातच त्यामुळेही जालावरील पुस्तके सापडू शकत नाहीत.
स्कॅन केलेले देवनागरी शब्द ओळखणारी प्रणाली विकसित होणे या साठी महत्वाचे आहे. मग मराठीतील पुस्तक स्कॅन करून युनिकोडित करता आले तर त्या सारखी बहार नाही. आशा आहे की यावर काही काम होईल.
पण माझ्या लिखाणात, इंग्रजीतील ज्ञानसंपदा भारतात विकण्यासाठी विदेशी संस्थांना पैसा मिळण्यापेक्षा एखाद्या भारतीय संस्थेला मिळावा, हा पण उद्देश आहेच.
तर, या संशोधनात्मक लेखनासाठी कुणी, कधी, काय काम एखाद्या विषयावर केले आहे हे समजण्यासाठी डिजिटल लायब्ररी ला काही पर्यायच नाही. याला अनेकदा विदागार (डेटाबेस) असेही म्हंटले जाते. इंग्रजी मध्ये संशोधनाचे लेखन प्रचंड प्रमाणात झालेले आहे. हे सगळे लेखन नुसते शोधणे, हा सुद्धा एक अवघड प्रकार बनला आहे. या साठी संशोधनाच्या लेखनाचा साठा उपलब्ध करून देणार्याच काही कंपन्या आहेत. या कंपन्या सर्व साधारण पणे विद्यापीठांशी करार करतात व त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरून त्यांच्या लेखन् साठ्यामध्ये प्रवेशाची मुभा देतात. यामुळे त्या कंपन्यांना पैसे मिळतात व ते अजून अजून लेखन एका छत्राखाली आणू शकतात. मात्र आज त्या साठ्यातही एखाद्या विषयावरचा लेख शोधायचा असेल,
तर त्या त्या विषयाचे काम करणारे स्वतंत्र समुह किंवा कंपन्या आहेत.
उदाहरणच घ्यायचे झाले तर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया विद्यापीठाच्या वाचनालयाच्या संकेत स्थळावरून अशा विदागारात शिरण्याची मुभा त्या विद्यार्थ्यांना आहे.
मात्र आत शिरल्यावर अशी विदागारेही खुप असतात. मला आत्ता दिसत असलेली फक्त ए अक्षरातली विदागारे १० आहेत. या विदागारांमधे असलेली अजून माहिती वेगळीच.
यात इन्फॉर्मिट A+ Education (Informit) आणि प्रोक्वेस्ट सारखी नावे दिसतात
ABI/Inform Dateline (ProQuest)
ABI/Inform Global (ProQuest)
ABI/Inform Trade & Industry (ProQuest)
वर पाहिलेत तर कळतेच की शोधणे सोईचे व्हावे म्हणून प्रो क्वेस्टने ही आपल्या विदागाराचे भाग करून ठेवले आहेत.
अशा रीतीने इंग्रजीतील डिजिटल वाचनालये वाढत आहेत. कोणत्याही प्रकारे एकच संशोधन परत परत होण्याची शक्यता टाळण्याचा प्रयत्न आहे. त्या वाचनालयांची एकमेकांशी जोडणी करून घेण्याचा वेगही वाढत आहे. त्यात असलेला धनाचा संग्रही वाढता आहे.
आज ऑस्ट्रेलियातील कोणत्याही वाचनालयाचे पुस्तक एकत्रीत जोडणीमुळे सहजतेने शोधता येणे शक्य होते आहे.
इतकेच काय ते मिळवण्याचीही सोय केली जाते आहे. यासाठी विद्यार्थ्याच्या फी मधून वर्षाच्या सुरुवातीलाच एक रक्कम घेतलेली असते.
संशोधनाच्या अनेक लेखांमध्ये भारतीय नावे संशोधक म्हणून दिसत असली, तरीही या सगळ्या व्यवसायात भारतीय वाचनालये कुठेही नाहीत ही मात्र खेदाने नोंदवावेसेच वाटते.
आशा आहे की एक दिवस असा नक्की येईल की किमान भारतातली सगळी विद्यापीठे तरी जोडलेली असतील.
आणि काही भारतीय कंपन्या तरी यात आपला व्यवसाय करायला लागलेल्या असतील.
भारतातच एक स्वतंत्र कंपनी स्थापून
या कंपनी द्वारे प्रो क्वेस्ट सारख्या विवीध संदर्भ विदागारांना शोधवाटा (गेटवे) देता येतील अशी मला खात्री आहे.
यातल्या काही डेटाबेस कंपन्यांना भारतात यायला सहकार्य मिळेल आणि भारतातल्या कंपनीला त्यांच्या
विदागारांचा एक्सेस!
असा दुवा म्हणून काम करणारी कंपनी उभी करणे हा डिजिटल लाय्ब्ररी उभी करण्यात महत्वाचा भाग ठरू शकतो.
ही कंपनी ताज्या संशोधनात्मक माहितीच्या पुरवठ्यासाठी अनेक उद्योगांशी आणि विद्यापीठांशी सहकार्य करार करून चांगले(च) पैसे मिळवू शकेल असे वाटते.
या साठी
१. कार्य नक्की काय करायचे आहे याचा पक्का विचार व्हावा.
२. एक व्यवसायाचा आराखडा (बिझिनेस प्लॅन?) बनवावा
३. आपल्याला कुठे पोहोचायचे आहे आणि किती काळात याचा विचार.
४. एक आस्थापन असणे गरजेचे.
५. मग विपणन/जाहिराती/आणि व्यवसायाचे जाळे विणणे (मार्केटींग)
६. एक अकाऊंटंट - आपण किती पाण्यात आहोत याचा कायंअ आढावा देऊ शकणारा
७. काही काळ तरी यात पुर्ण वेळ काम यात करावे लागेल, नंतर माणसे काम करू शकतील व आपल्याला वेळ मिळू शकेल (असे वाटते!)
यात अजूनही खुप वाव आहे असे माझे मत आहे. शक्य असल्यास खुद्द शोधवाटा (गेटवे) स्थापन करण्यात आजही आपण पुढाकार घेवू शकत असे वाटते.
या कार्यामुळे हे माहितीचे क्षेत्र नक्की कसे चालते याचे उत्तम आकलन तर होईलच,
शिवाय आर्थिक फायदा करून घेता येईल.
अजून फारशी स्पर्धा नसल्याने, वेळीच पाय रोवता येतील!
- निनाद
शनिवार, जून २८, २००८
मंगळवार, जून २४, २००८
नवीन सायकल
थंडी पडायला लागली आहे.
सकाळी तर चांगलाच गारवा आता जाणवतो. कधी कधी छान सोनेरी उन पडते ते अंगावर घ्यावेसे वातते. मी कधी कधी मधल्या सुटीत फ्लॅगस्टाफ च्या उद्यानाता जाउन बसतो. हिरवे गवत आणि वर ढग नसले तर नीळेशार आकाश बघायला मजा वाटते.
पानगळ आता अगदी संपत आली आहे. रात्रीच्या थंडीतही उभीच असलेली विरक्त झाडं दुपारची कोवळी उन्हं अंगावर घेतांना मला आनंदी झाल्यासारखी वाटतात.
लोकंही मफलर, स्वेटर कानटोप्या असा जामनीमा करूनच बाहेर पडतांना दिसतात.
एकुण हा ही ऋतू सुरेख आहे.
मागे गार्गी आणि मी पार्क मध्ये गेलो होतो. तिची नवीन सायकल घेऊन. अजून चालवायला जमत नव्हती. मीच आपला मागून लोटत होतो.
मग जरासा जोर करून मीच तीला एका उतारावर तीचे तीला जायला पटवलं. तिलाही ते जरासे पटले.
मग मगे उभाराहून जरा जोर करून सोडले तीला उतारावर. मस्त गरगरत गेली ती खाल पर्यंत. भलतीच खुष झाली. पहिलीच राईड! पण सायकल काही ओढत परत वर आणता आली नाही तीला!
मग परत एकदा जायचे ठरवले. मात्र यावेळी जागा तिनेच बदलली. परत मी उतारावरून सोडले. थोडी गेली आणि अचानक हँडल वळवले... वेडीवाकडी होवून हिरवळीवर आपटली, लोळलीच. अचानक बसलेल्या धक्क्याने डोळ्यात पाणी!
पण तेव्हढ्या तिथे आलेल्या भू भू मुळे हसू परत...

बुधवार, मार्च १९, २००८
वाळलेली पानं
तेरा मेरा याराना याद करेगी दुनीया?
ते माहीत नाही पण काही गोष्टी विसरणेच शक्य नाही...
ती मैत्री... निखळपणे काहीतरी एकमेकांसाठी करण्याची इच्छा. ते पावसातले भिजणे, गाडीवर मनमुराद भटकणे. मागच्या रस्त्याला फिरायला जाणे.
आणि एकदा असंच खूप राग आल्यावर भांडून येतांना शिरीषाच्या झाडाची वाळलेली पानं एकदम एका वार्यानं आंगावरून जाणं... तसाच त्या वार्यात रागही उडून जाणं. एकत्र अभ्यास, प्रोजेक्टस... काय अजब दिवस होते ते.
बुचाची फुलं वेचणं, बँबीजवर कॉफी पीत संध्याकाळी घालवणं. हे तू वाचायलाच पाहिजे आहे म्हणून सावाना मधून एकमेकांसाठी पुस्तकं आणणं.
आणि त्या कट्ट्यांवर बसून काय बोलायचो इतकं? भटकणं आणि गप्पा काय पण दिवस. खास होते अगदीच.
गेले ते दिवसही आणि ती सगळी बरोबरची मैत्रीपण. मीच त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून आलो... की सगळेच आपापल्या दिशांना पांगले?
कुणास ठाऊक परत कधी भेटतो.... माहीत नाही! आठवण तर खूपदा येते. त्या काही खास आठवणी बरोबर घेऊन चाललो आहे म्हणून चालतो आहे.

शनिवार, मार्च १५, २००८
मी?
काय आणि कसं... काही कळतच नाहीये.
माझं काय चुकतं की अजून कुणाचं.
कुठे चाललोय मी?
असं का घडतंय हे सगळं?
अजून किती आहे असा अस्वस्थ काळ?
किती वेळ थांबायचं आहे आनंदासाठी? साधं सोपं जगणं नाहीच का नशीबी?
शेवटी नातं हे फक्त शब्दांचंच असतं बाकी काहीच महत्वाचं नसतं पण तुम्ही नेमक्या वेळी उच्चारलेले योग्य शब्द.
हेच फार महत्वाचे असतात.
पण किती शब्द आणि त्यांचे खेळ खेळत बसायचे? का?
आता काही काळ शब्दांविण काढला तर?
जखमा भरू दे काही काळ.
खुपच बोललो, सगळं मनातलं बाहेर टाकत गेलो.
दुखावणं दुखाऊन घेणं चिक्कार झालं. हे सगळं थांबावं आता.
आयुष्याचा आनंदही घेता यावा, कुणालाही प्रश्न न करता आणि कुठलेच उत्तर न देता.
कदाचित मनातलं मनात ठेवावं आणि फक्त ऐकावं - बाहेरचं आणि आतलं अगदी, आतलं मनातलंपण.
कदाचित त्यातच आनंद असेल, त्यातच शांतता असेल.
-निनाद

गुरुवार, मार्च ०६, २००८
शब्द आणि शब्द...
एकदा नेहमी प्रमाणेच - शब्द आणि शब्द...
रात्रीची झोपण्याची वेळ.
तिला झोप आली होती,
पण बाबाशी खेळायचंही होतं. तीच्या शब्दांत 'गोशट' ऐकायची होती - दोंदील ढोमाजीची.
आईचं नन नन ना ना ना चं गाणं ऐकायचं होतं.
आणि मग अलगद आई किंवा बाबाच्या गळ्यात हात टाकून झोपी जायचं होतं.
पण...
पण इथे तर शब्द आणि शब्द.
कधी जोरात, कधी कुत्सित, लागट, टोचणारे, विखारी...
शब्दाने वाढणारे शब्द. कधीच न संपणारे शब्द...
या सगळ्यात एकच क्षण शांतता पसरली आणि त्या छोट्याश्या जीवाला बोलायला एक फट सापडली.
आपल्या पाळणाघरातले मिळालेले शहाणपण -
"श... बाबा, आई श... नो नो नो!!
जोप्पा आता जोप्पा.
नो नो!! जोप्पा "
अगदी त्या छोट्याशा ओठांवर एक बोट ठेवून मान हालवत म्हटलेलं "नो नो!!"
दोन क्षण शांततेत गेले.
नंतर अहंकारांनी परत उसळी मारली,
शब्दांच्या धगीत ते छोटंसं शहाणपण वितळून गेलं.
परत शब्द शब्द शब्द आणि त्यांची ती भडकलेली आग.
दोन मिनिटांनी त्याने पाहिले,
तर ती छोटी कधी नव्हे तो आपली आपण झोपून गेली होती.
बाबाची गोष्ट नि आईचं गाणं ऐकल्याशिवाय न झोपणारी आपलं आपण झोपली - आत अगदी आत काही तरी तुटलं होतं!
काय कोरलं गेलं असेल, 'आता आपणच झोपायला हवं आहे' असा निर्णय घेणार्या मनावर?
काय झालं असेल त्या त्या क्षणी त्या छोट्या मनाचं? कोणती असुरक्षितता असेल ती?
हे काय घडून गेलं?
कसं पुसता येईल परत?

सोमवार, मार्च ०३, २००८
अ रोड टू लदाख
अ रोड टू लदाख
अ रोड टू लदाख हा सिनेमा चूकूनही बघू नका.
अश्विन कुमार चा हा सिनेमा इतका टुकार आहे की विचारूच नका.
कलाकारंची कामेही अगदीच फालतु आहेत. शेवटी
इर्फान खानला गोळी लागल्यावर त्याच्या चेहर्यावर कोणतेही भाव येत नाहीत.
अरे साधी माशी बसली तरी पाहतो ना आपण... इथे तर आखी गोळीच बसली छातीत बंदुकीची.
छ्या! एकदम भंगार सिनेमा...
बाकी हिमालय दाखवलाय, पण त्यात काय विशेष रे?
तो तर काय साधा जुना सुपर ८ कॅमेरा फिरवला तरी भव्यच दिसतो.
कथा? काहीच सांगण्यासारखी नाही...
जागतिक वगैरे सिनेमाच्या रांगेत खरं मी हे लिहायलाही नको आहे. जाऊ देत्... कधी तरी असं स्लिप् ऑफ टंग सॉरी, स्लिप् ऑफ आय होऊन पाहिले जातात असले सिनेमे...
आणि हिमालयच बघायचा तर आम्ही 'हिमालय' हा तिबेटी सिनेमाच पाहु ना...
पाहिल्यावर पडलेला प्रश्न: का बनवलाय हा सिनेमा???
दिग्दर्शकः अश्विन कुमार
प्रभु: कोयल पुरी , इर्फान खान
भाषा: हिंदी, इंग्रजी

व्हिस्परींग सँडस्
व्हिस्परींग सँडस् किंवा बहासा इंडोनेशिया मध्ये पासीर बेर्बीसीक.
हा इंडोनेशियन चित्रपट इंडोनेशियाचे वेगळेच दर्शन घडवतो.
कथा अशी आहे. दया (दायन सास्त्रोवदोयो)
ही एक छोटी मुलगी तीच्या आईसोबत सागर किनार्या वरच्या एका छोट्याशा खेड्यात रहात असते. तीचे वडील लहानपणीच तीला सोडून गेले असतात. ते कसे असतील या विचारात ती तासंतास घालवते.
एकदा अचानक होणार्या दंगलीने त्यांना खेडे सोडून अजून दूरवरच्या वस्तीत जाऊन रहावे लागते. या किशोरवयीन मुलीवर आईचे करडे लक्ष असते. त्या करडेपणाला दयापण काहीशी नाखुष असते.
नव्या वस्तीत तीला एक मैत्रीण मिळते. दिघींचा काही काळ मजेत जातो पण एका घटनेत तीला तीची मैत्रीण गमवावी लागते. मात्र त्याचवेळी तिचे वडील अचानक पणे परत येतात... त्यांच्या बरोबर आलेला मित्र तीचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतो. दयाची होणारी मानसिक अवस्था अतिशय परिणामकारक रित्या दाखवली आहे. आईच्या हे सर्व लक्षात येते पुढचा अंदाज घेउन व ती दयाला या सगळ्यापासून दूर निघून जायला सांगते.

कथा संथ आणि तशी साधी व सुरुवातीला पकड घेत नाही असे वाटले तरी नंतर सिनेमा उत्सुकता धरून ठेवतो.
काही प्रमाणात इंडोनेशियाचे खरे सामाजिक ग्रामीण जीवनवही बघायला मिळते.
चित्रिकरणासाठी निवडलेले लोकेशन्स आऊट ऑफ वल्ड आहेत... संगितही अप्रतीम आहे. एक वेगळेच जग. वेगळाच अनुभव.
दिग्दर्शकः नान त्रिवेणी अचनास
लेखकः नान त्रिवेणी अचनास/रय्या मकारीम
इ.स. २००१
भाषा : बहासा इंडोनेशिया
प्र.भू. :दायन सास्त्रोवदोयो
ऍवॉर्डसः एशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिव्हल चे सिनेमॅटोग्राफी, साउंड. शिवाय, ब्रिस्बेन, सियाटल, ओस्लो, व सिंगापूर यथील निरनिराळ्या प्रकारची पारितोषिके.

कोंबडी पळाली तंगडी धरून
मला खरं तर लहान मुलं मोठ्यांच्या गाण्यावर नाचलेली आजिबात आवडत नाहीत... पण हे दोघे काय नाचतायेत... काय पर्फेक्ट टायमींग घेतायत. त्यामुळे मी तो विचार बाजूला ठेऊन म्हणतोय हे पाहा
यांच्या नाचा पुढे मूळ गाण्यातला नाच काहीच नाही,
अगदीच पांचट!

शनिवार, मार्च ०१, २००८
एकदा पहावं करून
नवे नाटक!
किती मेहेनत असते एखादे नाटक उभं करण्यात. नुसते संवाद पाठ करणे व व योग्य वळी फेकणे हा एक भाग झाला. पण इतर किती तरी अजून भाग आहेतच.
वेळो वेळी होणार्या तालिमी आणि त्यांना दर वेळी कमिटेडली जाणे. आपला रोल हा आपणच आहोत म्हणून मान्य करून त्यात एखाद्या सुरवंटासारखे शिरणे. तिथेच तालिमींया कोशात प्रयोगाचे सगळेकाही जमून येई पर्यंत वाट बघत थांबणे. आणि प्रयोगाच्या वेळी फुलपाखरू होऊन स्टेजवर भिरभिरणे. इतके काही सोपे वाटत नाही .
शिवाय अनेक इतर गोष्टींचा विचार करणे आहेच, उदाहरणार्थ स्टेज वर माईक्स कुठे हवेत. कारण पात्रांनी अभिनयाच्या भरात येऊन जागेवरून दूर गेले की आवाज बोंबलणार. किंवा टाळ्या आणि हशे यांच्या जागा घेताना द्यायचा वेळ. प्रेक्षकांची नस ओळखून त्यांना भावतील अशा संवादांवर भर. मुळात 'योग्य असं' ना़टक हाती लागणं आणि सगळी मंडळी जमून येणं.
छ्या! एक नाटक बसवायचं म्हणजे हजार गोष्टी आहेत त्या मागे.
बाकी या हजार गोष्टी आणि सगळी मेहेनत जमून आल्या की मात्र जी काही मजा येते ती औरच आहे. कालचा मेलबर्न मध्ये "एकदा पाहावं करून" असाच जमून आलेला प्रयोग. खूपच मजा आली बघायला. खरं तर अगदी साधा घिसापीटा नाटकाचा प्लॉट. दोन प्रेमी त्यांना लग्न करायचंय पण बाप लोक एकमेकांचे वैरी. मग एक एकमेकांची कुलंगडी काढून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न. शेवटी मनोमीलन.
पण इतका साधा पण विनोदाच्या अंगाने जाणारे नाटकाचे कथानक मंदार वैद्यने भन्नाटच बसवले. दिग्दर्शनातून संवादाच्या फेकीतून त्याने मस्त कलंदर बिनधास्त बाप्पा धरसोड असे काही उभे केले की प्रेक्षक अगदी फिदा! निलेश ने केलेला त्याच्या वयापेक्षा मोठा रोल व त्याचे प्रयोगभर बाळगलेले बेअरिंग मस्तच होते. म्हणजे अगदी एक प्रसंगात लाली इंदुरीकर या सो कॉल्ड तमासगीरीवर लट्टू झालेला बबनराव बाक्रे जे काही नाचतो ते परफेक्ट नाकासमोर चालणार्या पन्नाशीच्या माणसाचे आहे. आणि लाली इंदुरीकर उर्फ मंदाकिनी तर झकासच. तीच्या लाली इंदुरीकर च्या एंट्रीला काय टाळ्या आणि शिट्ट्या पडल्या विचारूच नका. येताजाता उपदेश करणारा बाप्पाच नोकर, मल्हारराव असलं मस्तपैकी "ढगाला लागली कळं" म्हणत अगदी 'टायमिंग ने पॉझ' घेऊन एग्झीट घेतो.
बाकी बाबीताई चे पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत असणारे पात्र तर फक्त दोन आठवड्यात संवाद पाठ करून उभे केले होते त्या, अभिनेत्रीला सलाम.
बापांच्या पत्नी व भामाबाई एकदम झकास. बाकी सगळेच कलाकार, सरवटे, प्रेमी युगुल वगैरे त्या त्या रोल मध्ये अगदी येकदम फीट्ट बसून सोडले होते बगा!
सर्वच कलाकारांनी खूपच मेहेनत घेतलीय हे सगळीकडे दिसून येत होतं. संगीतकार मकरंद भागवत सकाळपासूनच येऊन त्यांच्या ऍडजस्ट्मेंट्स करत बसले होते असे कळले. त्यांनी संगीतही अगदीच मस्त निवडलं होतं. क्वचित प्रसंगी जरा लाउड झालं तरी या नाटकाची ती गरजच आहे असं म्हणायला हरकत नाही. मंदाकिनी फक्त पिस्तुलाची ऍक्शन करते तेव्हा गोळ्या झाडल्याचे आवाज ऐकू येणं हे मस्तंच बसलं होतं. लाइट्स परफेक्ट होते.
नेपथ्य, ड्रेपरी व त्याला केलेली मेहेनत अगदी जाणवत होती. एकूणच सगळं काही विसरून जाऊन मनसोक्त हसवणारं नाटक असं सार्थच वर्णन याचं होतं.

लहान मुलांनीही कोणतीही रसभंग होइलशी गडबड काल केली नाही हे विशेष. अर्थात याचे श्रेय संगीत व नाटक वेगवान ठेवण्यालाही द्यायलाच हवे.
असो, कालचा दिवस मस्त गेला. शिट्या वाजवून वाजवून पार जीभ आणि बोटं दुखायला लागली माझी... :-))
तिकिटावर कलाकार व इतर काही माहिती असती तर मला इथे ती देता आली असती. असो. पुढच्या वेळी... :-)
-------------------------
त्या लिल्ल्या फोर् एव्हर मधनं बाहेर आलो थोडावेळ हे ही काही कमी नाही...

शुक्रवार, फेब्रुवारी २९, २००८
लिल्या फोर एव्हर
लिल्या फोर एव्हर -
हे परिक्षण समिक्षण वगैरे काहीच नाही ज्या काही सिनेमांचे परिक्षण समिक्षण करण्याच्या जवळपासही मी नाही त्यातला हा एक.
कथा
सिनेमा सुरु होतो तेंव्हा मार खाल्लेली ओठातून रक्त येत असलेली लिल्ल्या पळत जातांना दिसते. आणि मग सिनेमा मागे मागे जातो.
लिल्या (ओक्साना अकिन्शिना) एक सोळा वर्षाची मुलगी आहे. ती एस्टोनिया (रशिया) मध्ये राहते. तीची आई तीला एका डेटींग एजंसी द्वारे हाती लागलेल्या नवीन बॉयफ्रेंड बरोबर अमेरिकेला चालली आहे. तीच्या आई सोबत अमेरिकेला लिल्ल्यालाही अमेरिकेला जायचे आहे.

आई सांगते की मी आधी पुढे जाते मग मागून मी तुला बोलावून घेईन. लिल्ल्याला वाईट वाटते पण तरीही आई निघून जाते. लिल्ल्या वाट बघत राहते. काही दिवसात हे स्प्ष्ट होते की अमेरिकेहून काहीच येणार नाहीये आणि लिल्ल्या आता एकटीच येथे राहिली आहे. तीला वालोद्या नावाचा एक अकरा वर्षांचा मुलगा भेटतो. याला त्याच्या विचित्र वडीलांनी घरातून हाकलून दिलेले असते. आपले वडील असे का आहेत हे त्याला कळत नाही.
रस्त्यावर आलेला वालोद्या व लिल्ल्या एकत्र होतात. जणू काही एक छोटेसे कुटूंबच. एकमेकांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करतात.

एक दिवस मजा म्हणून ती व तीची मैत्रीण नताशा एका क्लब मध्ये जातात. तीथे नताशा एका माणसा सोबत झोपण्याचा निर्णय घेते. त्यातून तीला बरेच पैसे मिळतात. लिल्ल्या मात्र या सगळ्यातून अलिप्त राहणेच पसंत करते. घरी येवून झोपलेली असतांना रात्री अचानक नताशाचे आईवडील तेथे येतात व तीला पैसे हातात देउन सांगतात की आम्हाला 'असे पैसे' नकोत. लिल्ल्या काहीच कळत नाही.
दुसर्या दिवशी नताशाला विचारल्यावर नताशा सांगते की तीने स्वता:चे नाव वाचवण्यासाठी वडीलांना खोटे सांगितले की लिल्ल्याने असे करून हे पैसे मिळवले आहेत. चिडलेली ल्लिल्ल्या अस्वस्थ होते व ते पैसे कचर्यात फेकून देते. हे सगळ्या गल्लीत पसरते व लिल्ल्याला सगळे चिडवायला लागतात.
काही दिवसातच तीच्या पैसे न भरल्याने अपार्टमेंट ची वीज कापली जाते. खायलाही काही उरत नाही. मेणबत्ती वर काही उबही येत नाही. नाईलाजाने अस्वस्थ लिल्या काही दिवसातच पैसे नसल्याने एका क्लब मध्ये वेश्या व्यवसायाचा मार्ग पत्करते.
एक दिवस तीला एक माणूस भेटतो. तो तीला स्वीडन मध्ये नोकरीचे अमीष दाखवतो. या जगातून बाहेर पडून आता तरी जगायला मिळेल या आशेवर ती जायला तयार होते. खोट्या पासपोर्ट च्या आधारवर हे सगळे घडते. इकडे वालोद्या खूप अस्वस्थ होतो. मात्र लिल्ल्याही तीच्या आई प्रमाणेच वालोद्याला सोडून स्वीडन ला जाण्याचा निर्णय घेते.
स्वीडन मध्ये नोकरी हे स्वप्नच ठरते तीथे तीला जबरी वेश्या व्यवसायाला लावले जाते. एका मागून एक बलात्कार होत राहतात. लिल्ल्याला वेड लागायचेच बाकी राहते.
इकडे रशिया मध्ये वालोद्याला त्याचा एकमेव मासिक आधारही गेल्याचे सहन होत नाही व तो आत्महत्या करतो.
लिल्ल्या एकदा पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण तीला पकडून बदडून परत आणले जाते. या सगळ्यात वालोद्या तीला देवदूताच्या रूपाने स्वप्नात भेटत असतो.
तो तीला परत पळून जाण्याचा सल्ला देतो. व ती तसे करते, पळत सुटते. पण अनोळखी प्रदेशात भाषा येत नसतांना प्रचंड मार खाउन डोळे सुजलेले असतांना तीला पाण कुठे जातो आहोत याचे ही भान रहात नाही. इथेच सिनेमा सुरु झाला होता.

सिनेमाच्या शेवटी वालोद्या व लिल्ल्या दोघेही देवदूत झाले आहेत. सगळ्या क्रूर जगापासून दूर वालोद्या व लिल्ल्याच्या आवडत्या गच्चीवर आनंदाने खेळतांना दिसतात.
---
सिनेमा संपल्यावर प्रचंड अस्वस्थता या बरोबरच अनेक प्रश्न मनात येत राहतात. आशाने, स्वप्नाने भरलेल्या डोळ्यांचा, लिल्ल्याचा चेहरा आईचे सोडून जातांना लिल्ल्याचा आकांत... डोळ्यापूढून हलतच नाही.
लिल्ल्याच्या आईचेही असेच झाले असेल का हा प्रश्न आपोआपच मनात येतो. ती खरंच अमेरिकेला गेली असेल का? लिल्ल्या हा आजच्या देशांतरावर व शरणागतांच्या प्रश्नावर असलेला कंटेंपररी सिनेमा आहे असे जाणवते. कोणताच आधार नसलेल्या लोकांसाठी कोणत्याही देशात गेले तरी आयुष्य तसेच पिळवणूकीचेच असते. रशियाच्या आजच्या समाजाचे दर्शन हादरवणारे आहे. लुकास मूडीसन हा दिग्दर्शक एक क्रूर पण खरा अनुभव देउन जातो. सिनेमा नसून ही एक डोक्युमेंटरीच आहे असेही म्हणायला हरकत नाही. इतके का हे भांडवलवादी पुरूषी जग निर्दय बनत चालले आहे? पैश्या साठी होणारा मानवी व्यापार व त्यात दिसलेल्या मानवी क्रौर्याने अस्वस्थ होत जातो आपण. एका छोट्याश्या मुलीला जगण्यासाठी कोणतेच बळ हे जग देउ शकत नाही का? कुठलाच आधार मिळू नये का? असी आजही घडतेच आहे... हे कधी थांबणार आहे सगळे...? नक्की कुठे चाललो आहोत आपण?
लेखक/दिग्दर्शकः लिकास मूडीसन
इ.स. २००३
भाषा: रशियन/स्वीडीश
प्र.भू.: अक्साना अकिन्शीना(लिल्या), अर्त्योम बोगुशार्स्की(वालोद्या), ल्युगोव अगापोवा (आई)
ढीगाने ऍवॉर्डस मिळाले आहेत... क्लोत्रुदी, युरोपियन फिल्म साठी बेस्ट दिग्दर्शक, ऍक्ट्रेस साठी नॉमिनेशन
गिजों फिल्म फेस्टीव्हल चे बेस्ट दिग्दर्शक, ऍक्ट्रेस चे मिळवले.

गुरुवार, फेब्रुवारी २८, २००८
स्वीमींग पूल
स्वीमींग पूल
हा फ्रेंच सिनेमा.
एक ब्रिटिश गुन्हेगार कथा लेखिका जरा विरंगुळा व्हावा म्हणून प्रकाशकाला भेटायला येते.
तो सुचवतो की तू माझ्या फ्रांस मध्ये असलेल्या घरी सूटी घ्यायला म्हणून रहायला जा.
ती तयार होते.
तेथे गेल्यावर एक दिवस मस्त जातो. मात्र नंतर त्याची तरूण मुलगीही तेथे अवतरते. ही बिंधास्त मुलगी व तीचे सदैव घराच्या तलावात पोहणे व तीची प्रणयी व लाउड जगण्याच्या तर्हेने ही लेखिका अस्वस्थ होउन जाते.

आधी त्रास दायका वाटली तरी नंतर तीला या मुलीची जगण्याची तर्हा आकर्षक वाटायला लागते. खरं तर लिखाणाला प्लॉट सापडत जातो.
ती पण ही कथा लिहित जाते.
मात्र एका धुंद रात्री एक अपघात घडतो.
आणि मग ही रहस्यमय गुन्हेगारी कथा लिहिणारी लेखिका स्वतःच एका गुन्ह्यात आधी साक्षिदार व नंतर सहभागी ही होते. ते सगळे दाबण्यासाठी काहे उपायही करते. त्यामुलीचे व त्या योगाने प्रकाशकाचे आयुष्य हे सगळेच समोर येते.
पुढे काय होते ते पडद्यावरच पहा...
एकुण सिनेमा बरा आहे. खुप काही खास नाही.
फ्रेंच लोक ब्रिटिशांना कसे खालच्या दर्जाचे समजतात हे ती मुलगी बिंधास्तपणे वेगवेगळ्या प्रकारे लेखिकेला ऐकवते व तीची 'स्वत: कधीच जगलेली फक्त इमॅजिनरी गुन्हेगार लेखिका' म्हणून संभावना करते ते संवाद सही आहेत.
लेखक/दिग्दर्शक : फ्रांस्वा ओझों
इ.स.२००३
भाषा : फ्रेंच
प्र.भू.: शार्लोट रँपलींग, लुदविने सॅनिये, मार्क फोये
ऍवॉर्डसः बँकॉक फिल्म फेस्टीव्हलचे बेस्ट फिल्म, कान महोत्सवात गोल्डन पाम साठी नॉमिनेटेड

बुधवार, फेब्रुवारी २७, २००८
शब्द
शब्द
एक दिवस येतो आणि काही वेगळेच शब्द देउन जातो.
का ती रागावते? का वापरते ती ते शब्द?
का इतक्या छोट्या गोष्टी इतक्या महत्वाच्या ठरतात.
तीचा आनंद म्हणजे तरी नक्की काय आहे?
मलाही का त्याचे इतके महत्व? मी तरी का असे शब्द बोलण्यात घेतो?
कारण शब्द... शब्द हेच नातं असतं हो. पण काय करू ते शब्द मिळतच नाहीत जे हवे हवेसे असतात. जे मला मिलत नाही ते मी देण्याचा प्रयत्न करतो. शब्दांचे बुडेबुडे सोडतो. आणि मग त्यातच हरवून जातो.
त्यातलेच दोन बुडबुडे घेवून ती मला म्हणते "हे तुझे शब्द, बघ तू काय म्हणालास"!
मी त्याचा भलताच अन्वयार्थ पाहून गारच होतो. शब्दांचा झालेला फेस पाहून गप्प बसतो.
"का हे सगळं असं?" हे कदाचित तीलाही माहीत नाही ना मला!
मी, मी होतो तेंव्हाचं साध्या शब्दांचं जग परत खुणावतं. आताचे 'आम्ही' इतके का कठीण झालो आहोत अर्थानी. शब्दांनी इतके वार का केले आहेत एकमेकांवर? कधी भरून येणार ते वार? कधी परत जगायला सुरुवात करायची?
कधी तरी 'मला नकोच हे सगळं' असं वाटतं. सोडून दूर निघून जावं कुठे तरी बिन शब्दांच्या जगात मौनपणे.
... मग एक शब्द ऐकु येतो अगदी साधा - बाबा!
मग सगळे शब्द आणि त्यांचे वार विसरून जायला होतं...
र्हुदय शब्दां पूढे धावत सुटतं...

सेक्स अँड लुसीया - कथा
सेक्स अँड लुसीया
वाट्ला तितका काही सिनेमा नुसताच प्रणयात्म नव्हता.
इन् फॅक्ट भलताच कोंप्लेक्स होता असं वाटलं. सिनेमा संपल्यावरपण बराच वेळ (वरून खाली येणारे टायट्ल्स बघत) विचार करत बसून राहीलो.
कथा साधारणपणे अशी.
लुसिया ही माद्रीद मधली एक् वेट्रेस. आपल्या लेख लॉरेंझोच्या प्रेमाचा शेवट झालेला सहन न होवून एक छोट्याशा बेटावर काही काळ जाउन राहण्याचा निर्णय घेते. हा अगदी अनोळखी अशा वातावरणाता सगळे विसरून जाण्याचा काहीसा प्रयत्न असतो.
तीचा प्रेमीक लॉरेंझो व लुसीया यांची कथा या बेटावरून उलगडत जाते. ज्यांना लुसीया कुठलाच संबंध नसलेले समजत असते ते तीच्या किती जवळ व गुंतलेले असतात याचा अनुभव ती घेते (आणि आपणही घेतो!)
लॉरेंझो सहा वर्षांपुर्वी याच बेटावर पोहोत असतांना एका मुलीच्या ऍक्रॉस येतो. तो त्याचा वाढदिवस असतो. त्यांचा पॅशनेटली झालेला प्रणय ही त्याला अचानक पणे मिळालेली भेट असते. एकमेकांचे नावही न घेता हे दोघे प्रणयी वीर दूर जातात.
मात्र त्यातून तीला एक मुलगी होते. याची लॉरेंझो काहीच कल्पना नसते.
लुसीया एक दिवस त्याला पाहते व त्याचे लिखाण आपल्यावर खूप प्रभाव पाडून गेले आहे अशी कबुलीच देते.
शिवाय मला तुझ्या बरोबरच रहायचे आहे असेही सांगते. लॉरेंझो व ती त्याच्या घरी येतात... (मग अगदी पॉर्न फिल्म होईल असा प्रणय पुढे आहे.)
लॉरेंझो आपली कथा/कादंबरी लिहिण्याच्या प्रयत्नात असतो. त्यात तो खूपच गुरफटून जातो.
पाळणाघरा जवळ त्याला एक केयरटेकर मुलगी तीच्या बॉसच्या मुलीला, लूनाला खेळवायला घेऊन आलेली भेटते. तीच त्याची लूना मुलगी असते. (पण अर्थातच तो तीला ओळखत नाही त्याचे नाव लॉरेंझो म्हणजे सूर्य). छोट्याशा मुलीला तीचे वडील हवे असणं किती महत्वाचं असते तेही एक प्रसंगात दिसून जातं.
ती त्याला त्या रात्री घरी येण्याचे आवाहन करते व तो जातो. तीला तो 'आवडलेला' असतो. मात्र लॉरेंझो त्या मुलीकडेच लक्ष देतो. त्या मुलीला झोपवण्याचे काम तो करतो. तीला एक सुंदरशी बेटावरची गोष्ट सांगतो.
मात्र त्या केअरटेकरच्या प्रणयाच्या नादात तो आपल्याच मुलीच्या मृत्युला कारणीभूत ठरतो.
त्याच रात्री त्याचाही अपघात होतो. त्याचा मृत्यु झाला असे समजून लुसीया बेटावर निघून जाते.
सगळी पात्रे त्यांचे नशीब आणि योगायोग याची जुळणे होत कसे एकमेकांना भेटत, ओळखत जातात व पुढे शेवट काय होतो हे पडद्यावरच पाहा.
लेखक दिग्दर्शक जुलियो मेदेम ची ही एक खास कथा आहे यात संशय नाही.
या कथानकात शेवटातून मध्यात यायला एक खास जागा आहे जी आपल्याल गुंगवून टाकते.
बाकी चित्रिकरण/लोकेशन तर अप्रतीम आहे. जुलियो मेदेम च्या प्रेमिकेनेच याचे कला दिग्दर्शन केले आहे.
पाझ वेगा पुढे पेनेलोप क्रूझ तर काहीच नाही! तीचा अभिनयही सुरेख आहे.

मंगळवार, फेब्रुवारी २६, २००८
सेक्स अँड लुसीया
सेक्स अँड लुसीया हा २००१ सालातला स्पॅनीश सिनेमा.
अर्थात नावात असल्यापर्माणेच भन्नाट सेक्स यात आहेच.
पण कथाप खूपच गुंतागूंतीची आहे.
कथानक पुढच्या पोस्ट मध्ये देतो.
लिहायला वेळ लागेल.
बाकी नायिकेच्या भूमीकेतील पाझ वेगा बद्दल मी काय लिहिणार?
"बघा" इतकेच म्हणू शकेन. ;-))
मला तीची पॅशनेट भूमीका आवडली.
लोकेशन्स तर सुरेखच आहेत. बेट व त्यावरचा निसर्ग मनोहारी...

दिग्दर्शक /लेखक: ज्युलियो मेदेम
इ.स.: २००१
भाषा: स्पॅनीश
प्रभू: पाझ वेगा, त्रिस्ताम उलोआ, नज्वा नीम्री

सोमवार, फेब्रुवारी २५, २००८
स्वगत
"बाबा तू येना... बाबा तू ये. मला तू हवाय""
इतकेच म्हणते ही फोनवर. दुसरे काहीच नाही!
काय करावे. मन हेलकावतय. जाण्याची इच्छा तर खूप आहे. पण कसे जमवावे...
इतके दिवस झालेत. इतके म्हणजे किती, तर ती बोबड्या बोलां नंतर चक्क व्यवस्थित बोलू लागलीय.
अरे मग त्यात काय? एका आठवड्यात होते ही प्रोसेस.
फक्त प्रोसेस? आठवड्यात होणारी एक प्रोसेस्?
किती काही आहे त्यात... वाक्य बोलण्यामध्ये सकारण स्प्ष्टीकरण पण येते.
मग ते साधेसे बोल विरून जातात् नि उरतात शब्दांचे बुडबुडे.
त्यापेक्षा ते बोबडे पण खरे खुरे बोलच बरे.
छे!! नकोच हे लॉजिक मला.
जाण्या आधी चा किस्सा,
मुगाच्या डाळीचे वरण झाले. डबा खालीच होता.
मी आपले उचलला डबा लावून टाकले झाकण आणी दिला ठेवून वर.
अचानक तीने मोट्ठे भोकाड पसरले. "माझा कासवदादा....""
"कोणते कासव? कसे कासव"
परत डब्याकडे बोट दाखवून -
"माझा कासवदादा.... "
"अगं ती डाळ आहे. कासव नाही काही!"
माझे मट्ठ मोठ्या माणसांचे लॉजिक.
"नाई... माझा कासवदादा.... कासवदादा... कासवदादा... कासवदादा""
शेवटी कशीबशी समजूत निघाली आणी रडून रडून झोपली.
मलाही कळलेच नाही की हीला कासवदादाची इतकी का आठवण.
दुसर्या दिवशी सकाळी डाळ फडताळातून खाली
आल्यावर आधी त्यावर तीने झडप घातली आणी डाळीत हात.
मी "अगं अगं" म्हणे पर्यंत हातात चक्क एक् छोटंसं हिरवं कासव!
तीने डब्यात जपून ठेवलेलं!!
मी आव्वाक्!

मी त्यावर काहीच लिहू शकत नाही...
कधी कधी चांगला सिनेमा असेल तर २ वेळा पाह्तो.
एखादा सिनेमा इतका आवडतो मी त्यावर काहीच लिहू शकत नाही...
जसे सध्या ल पॅपिलिआँ...
त्याच्या फ्रेम्स आठवणे आठवतच राहणे, संवाद आठवणे.... भाव... कथा, नयन रम्य चित्रण सगळे काही मनात अगदी रूतून बसले आहे.
ती आईच्या प्रेमाला आसूसलेली छोटीशी मुलगी आणि तिरसटराव म्हातारा जुलियाँ. त्याचे एकदम टिपिकल फ्रेंच स्लँग मध्ये नो! नो!! ए नो!! म्हणणे.
किंवा त्या छोटीचे हे फुलपाखरू कोणत्या "ब्रँडचे" आहे हे विचारणे. हे अविस्मरणीय!
मी म्हंटले तरी बाहेर येणे होत नाहीये. त्यामुळेही नंतर पाहिलेला लूंदी मातीन अगदी साधा वाटला असेल.
अशी विचारांची मिसळही होते कधी कधी. पण मी म्हण्तो की हेच आहे तुमची कथा किती सशक्त आहे आणि ती किती परिणाम घडवू शकते हे असेही दिसूनच जाते.
तसाच इटालियन "मलेना" ही बाजूला ठेवलाय परत बघायला म्हणून.
आणि बर्गमनचा पर्सोना लिस्ट मध्ये आहे.

लूंदी मातीन
लूंदी मातीन (मंडे मॉर्नींग) हा फ्रेंच सिनेमा पाहिला.
काहीसा विनोदी.
एका लहान गावातला विंसेंट हा साधारण पन्नाशीचा माणूस रोजच्या कारखान्यात वेल्डर असण्याच्या दिनक्रमाला कंटाळून चित्रकार होण्यासाठी व्हेनीसला पळून जातो.
मग त्या सगळ्या घटनाक्रमात काय काय घडते याचे काहीसे विनोदी चित्रण आहे.
विनोदाला लागणारे बरेचसे घटक जसे, बायकांना न्याहाळणारा पॅरिश मधला धर्मगुरू, नागड्या नन्स, बगीच्यात येणारी मगर वगैरे भरपूर आहेत. पण सिनेमा खदखदवून हसवत नाही. संथपणे कथा घडत जाते.

लेखक/दिग्दर्शक :ओतर लॉसेलियानी
इ.स.: २००२
भाषा: फ्रेंच
प्रभू:जॅके बीदू
ऍने क्राव्ज-तर्नव्स्की
बर्लीन इंटरनॅशनल फिल्म महोत्सवात ओतर लॉसेलियानीला फ्रिपेस्की ऍवॉर्ड शिवाय गोल्डन बर्लीन बेर साठी नॉमिनेशन.

रविवार, फेब्रुवारी २४, २००८
वॉर्म वॉटर अंडर अ रेड ब्रिज
वॉर्म वॉटर अंडर अ रेड ब्रिज हा जपानी सिनेमा
बरा होता. अगदी काही मजा आली नाही बघायला.
आपली नोकरी व कुंटूंब गमावलेला योसुके टोक्योच्या रस्त्यावर येतो. त्याला म्हातारा टॅरो भेटतो. काहीसा तत्त्वज्ञ असणारा हा माणूस त्याला सांगतो की नोटो या समुद्र किनाऱ्यावरच्या गावात लाल पुलाजवळच्या एका घरात खजिना लपवलेला आहे. टॅरोने तेथे क्योटो येथून चोरलेला सोन्याचा बुद्ध लपवलेला असतो. म्हातारा टॅरो अचानकपणे मेल्यावर योसुके हा खजिना शोधायला निघतो. शहरात पोअल्यावर तो एका सुपर मार्केट मध्ये जातो. तिथे तो एका मुलीला भुरटी चोरी करतांना पाहतो. ती मुलगी तेथून निघून गेल्यावर त्याला तिथे तीच्या कानातले सापडते. शोधाशोध करत त्याला 'ते' त्याला घर सापडते पण तेथे एक म्हातारी तीच्या तरूण साएको नावाच्या नातीसोबत राहत असते. हीच ती भुरटी मुलगी असते. योसुके तीची जवळीक तयार होते. साएकोला एक प्रॉब्लेम असतो, तीचे प्रणयातले एजॅक्युलेशन चक्क बादलीने पाणी ओतावे तसे वाहत असते. या पाण्याची एक खासियत असते. यामुळे कोणताही ऋतू नसतांनाही फुले फुलतात. तसेच समुद्रातले मासे पोहोत नदीमध्ये येतात व त्यासाठी गोळा होतात.

योसुके ला एका मच्छीमार होडीवर काम मिळते व तो त्याच शहरात राहण्याचा निर्णय घेतो. साएकोसोबत होत असलेल्या प्रणयाने साएको 'बरी' व्हायला लागते. त्याचवेळी अजून एकजण या बुद्धाची चौकशी करायला टोक्योहून तेथे येवून पोहोचतो. त्यातच एका गँगलाही या सगळ्याचा सुगावा लागतो. पुढे सगळी पळापळ पडद्यावरच पाहा.
शोही इमामुरा चा हा शेवटचा सिनेमा होता.
काहीसा विनोदी वेगळाच व चमत्कारीक पण आजच्या जपानचे बरेचसे चित्रण करणारा एक बरा सिनेमा इतकेच.
दिग्दर्शकः शोही इमामुरा
इ.स.: २००१
लेखक: यो हेन्मी व शोही इमामुरा
भाषा: जपानी
प्र.भू.. : कोजी याकुशो, मिसा शिमीझु

शनिवार, फेब्रुवारी २३, २००८
पर्सोना
सध्या हॉलिवुडपटांपासून सध्या इतका दूर गेलो आहे की
पडद्यावर इंग्लिश ऐकले तरी कसेतरीच वाटते :-))
आता मला आता इन्मार बर्गमन ने दिग्दर्शित केलेला पर्सोना बघायचाय.
हा १९६६ मध्ये आला होता.
पाहुया मिळतो का.
कथा मला तरी चांगली वाटते आहे आणि शिवाय इन्मार बर्गमन हे नाव... मोठं नाव!
कुणी पाहिलाय का हा?

वेंद्रेदी स्वा
वेंद्रेदी स्वा (vendredi soir) हा फ्रेंच सिनेमा पाहिला.
शुक्रवारची पॅरिसमधली रात्र. लौरा आपल्या अपार्टमेंट मधली आवरा-आवरी करते. ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत आता रहायला जाणार असते. ती आपल्या गाडीत बसून डिनरसाठी बाहेर पडते. रस्त्यावर आल्यावर तीला कळते की ती आज पब्लीक ट्रासपोर्टचा संप आहे. त्यामुळे सगळीकडे मोठा ट्रॅफिक जाम! ना ती पुढे जाउ शकते ना ती घरी जाउ शकते. तसेच तीचे आयुष्यही काही काळासाठी थबकते.

रेडियोवर आवाहन होते की जमेल तशी लोकांना लिफ्ट द्या.
ती रस्त्याने जाणार्या 'जीन'ला पाहते. तो तीच्या काचे वर टकटक करतो.
ती लिफ्ट तर देते पण गाडी हलतच नाही. शेवटी गाडी सोडून देतात. पायी आपल्या मित्रांच्या भेटी गाठी करत फिरत असतांनाच एकमेकांबद्दलचे आकर्षण वाढते. ही छोटीशी भेट अर्थात रात्रीच्या शॄंगारात बदलते.
एकमेकांच्या आयुष्यातले इतर कोणतेही संदर्भ न येता दोघे पॅरिस मधल्या एका साध्याशा हॉटेलमध्ये रात्रीचा आनंद लुटतात. (कंटेंपररी फ्रेंच सिनेमा मधे "कोणतेही संदर्भ न येता "हा भाग महत्वाचा झाला आहे आजकाल)
या सिनेमाची फोटोग्राफर एक स्त्री आहे. त्यामुळे शॄंगाराचे चित्रण वेगळ्याच एंगल्सनी होते आहे हे मात्र नक्कीच जाणवले.
किंवा काही ठिकाणी कॅमेरा स्थिरावतो आहे हे ही जाणवत राहते. हातांची पकड चेहर्यावरचे भाव.

शिवाय अबोल क्षण... सिनेमातील पात्रे प्रणयात खूप काळ अबोलपणे घालवतात. चटोर प्रणय पण शारीर न करता केलेली वेगळीच फोटोग्राफी.
सकाळी लौरा उठते सगळा ट्रॅफिक जाम आता संपलेला असतो. रस्ते मोकळे आ॑हेत. औरा आता एक नवी व्यक्ती बनून एक वेगळेच मुक्ततेचे हास्य घेउन बाहेर पडते व नव्या दिवसाकडे निघून जाते...
अशा वन नाईट स्टँड मधून स्त्री पारंपारीकतेतून मुक्ततेकडे जाते आहे असा काहीसा भाग(?).
पॅरिस चे चित्रण नेहमीपेक्षा खूपच वेगळे आहे. काहीसे अनोळखी भासणारे आहे.
चित्रपट मी आधी दिलेल्या अ पॉर्नोग्राफिक अफेयर ला अगदीच समांतर आहे. यापुढे पॉर्नोग्राफिक अफेयर खूपच सुरेख आहे.
दिग्दर्शक :क्लेर डेनीस
लेखक : एमॅन्युएल बर्नहेम
इ.स. २००२
भाषा : फ्रेंच
प्र.भू. : वालेरी लेमर्सियर
विंसेंत लिंदाँ
२००४ चे क्लोत्रुदीस अवॉर्ड सिनेमॅटोग्राफीसाठी ऍग्नेस गोदार्दला मिळाले

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)